प्रवेशाच्या नावाखाली २० लाखांचा गंडा


प्रवेशाच्या नावाखाली २० लाखांचा गंडा
SHARES

रांचीमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


वैद्यकीय प्रवेशाचे अामीष

कुरारच्या आप्पापाडातील बुद्धीया चाळीत विश्वनाथ शहा हे राहतात. त्यांची मुलगी नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली असून तिला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. मात्र, गुण कमी असल्यामुळे तिला मुंबईतील काॅलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. याच दरम्यान त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीची भेट विश्वनाथ यांच्याशी झाली. यावेळी विश्वनाथ यांनी आपली अडचण आरोपीला सांगितली. आरोपीनं विश्वनाथ यांना आपल्या ओळखीवर झारखंड येखील रांचीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं अाश्वासन दिलं.  त्याने शहा यांच्याकडून प्रवेशाच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले. 

मात्र, कित्येक दिवस उलटूनही प्रवेश झाला नाही. शहा यांनी याबाबत अारोपीकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अारोपीने अापला मोबाइल बंद केला. अापली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विश्वनाथ यांनी  कुरार पोलिसांकडे धाव घेतली. 



हेही वाचा -

धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ

बाईक रायडर चेतना पंडीतची आत्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा