बाईक रायडर चेतना पंडीतची आत्महत्या


बाईक रायडर चेतना पंडीतची आत्महत्या
SHARES

मुंबईतील नामवंत बाईक रायडर अाणि महिला मोटरसायकल प्रशिक्षक चेतना पंडीतने (२५) राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.  चेतनाच्या घरात सुसाइड नोट सापडली अाहे.  माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू न शकल्याने मी आत्महत्या करत आहे, असं तिनं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.  दिंडोशी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.


भावाची माफी मागितली 

गोरेगाव पूर्वेला पद्मावत सोसायटीत चेतना तीन मैत्रिणींसह भाड्याने राहत होती. दुचाकीवरून ती जगभ्रंमती करत असल्याने ती कायम चर्चेत असायची. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने घरातील पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.  

 मंगळवार दुपारपासून तिच्या घराचा दरवाजा खूप वेळ बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय अाला. शेजारी घरात गेले असता त्यांना  चेतना मृतावस्थेत आढळली. चेतनाच्या मागे एक भाऊ अाहे. सुसाइड नोटमध्ये तिनं भावाची माफीही मागितली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिस अधिक तपास करत अाहेत. 



हेही वाचा -

मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!

३ महिन्याचं बाळ पळवणारी महिला गजाआड




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा