मुंबईचा डबेवाला अडचणीत, डब्बेवाल्यांची केली फसवणूक

दुचाकीचे हप्ते थकल्यानंतर डब्बेवाल्यांना पतसंस्थेकडून जप्तीच्या नोटीसा आल्या आणि डबेवाला पायाखालची जमिन सरकली.

मुंबईचा डबेवाला अडचणीत, डब्बेवाल्यांची केली फसवणूक
SHARES
चोख व्यवस्थापनेसोबत प्रामाणिक पणेसाठी ओलखला जाणारा मुंबईच्या डबेवाल्यांच्या भोळेपणाचा आधार घेऊन फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. ही फसवणूक दुसरी तिसरी कुणी नसून डबेवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप डबेवाल्यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबईच्या घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचाः- Video: माटुंगा स्थानकात विकृताने घेतलं विद्यार्थीनीचं चुंबन


मुंबई डबेवालाअसोसिएशनच्या पदावर असताना. असोसिएशनचे पदाधिकारी विठ्ठल सावंत,  माजी प्रवक्ता सुभाष तळेकर, दशरत केदारी, यांनी २०१५ मध्ये घाटकोपर येथे डबेवाल्यांची एक सभा घेतली होती. या सभेत आरोपींनी डबेवाल्यांना पायी आणि सायकलने डब्यांची ने-आण करणे जड जात असल्याचे कारण सांगून असोसिएशनद्वारे मोफत टिव्हीएस मोपेड देण्याची घोषणा केली. त्यासाठी आरोपींनी ६० सभासदांकडून अर्ज भरून घेतले. डबेवाले उच्चशिक्षित नसल्यामुळे त्यांनी न पाहताच, सर्व कागदपत्रांवरसह्या केल्या, महिन्याभरानंतर नवी मुंबईच्या भैरवनाथ पतसंस्थेद्वारे डबेवाल्यांना दुचाकीचे वाटप करण्यात आल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली. त्यानुसार तक्रारदारांनी पदाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणी केली असता. तळेकर, केदारी, सावंत यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. 

हेही वाचाः- विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक


कालांतराने दुचाकीचे हप्ते थकल्यानंतर डबेवाल्यांना पतसंस्थेकडून जप्तीच्या नोटीसा आल्या आणि डबेवाल्यांच्या पायाखालची जमिन सरकली. डबेवाल्यांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी त्या दुचाकी एका एजंटला विकल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डबेवाल्यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी घाटकोपर पोलिस अधिक तपास करत आहेत. मला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे कारणस्थान असून  माझ्या विरोधात खोट्या तक्रार दाखल होतील, याबाबत मी गृहखात्याला कळविले असल्याचे सुभाष तळेकरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

हेही वाचाः- मुंबईच्या वाहतुकीचे Live अपडेट
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा