नेव्हीत नोकरीचं आमिष दाखवून साडेनऊ लाखांची फसवणूक

अचानक एक दिवशी लक्ष्मण खोली सोडून पळून गेल्याची माहिती शरद पवार यांना कळाली. त्यांनी तातडीने शंकर आणि आनंदा यांना त्याची कल्पना दिली. लक्ष्मणचा फोनही बंद येत होता.

SHARE
भारतीय नौदलात नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची  साडेनऊ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्याला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण किसन बेंडकोळी (३४) असं या आरोपीचं नाव आहे. मेव्हणीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. याआधी त्याने अशा प्रकारे फसवल्याचं तपासात पुढं आलं आहे.

नेहरूनगर परिसरात राहणारे आनंदा पाटील हे छोटी-मोठी कामं करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. आनंदा यांच्या भावाचा मुलगा शंकर नुकताच बारावी पास झाल्याने नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. त्यावेळी शंकरच्या नोकरीसाठी आनंदा यांनी त्याचा मित्र शरद पवार याच्याकडे बोलणी केली. त्यावेळी शरद यांनी त्याच्या शेजारी राहणारा लक्ष्मण नेव्हीच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर चालक असून त्याने अनेकांना पैसे भरून नोकरीला लावल्याचं आनंदा यांना सांगितलं. त्यावेळी आनंदा यांनी शरद यांना लक्ष्मणजवळ विचारणा करण्यास सांगितली. लक्ष्मण यांनी आनंदा यांना नेव्हीत लेखी परीक्षा, तोंडी आणि मैदानी परीक्षा न देता नोकरी मिळवून देण्यासाठी साडेतीन लाख द्यावे लागतील असं सांगितलं.

त्यानुसार आनंदा यांनी सोनं गहाण ठेवून पैसे उधारीवर घेऊन लक्ष्मणला दिले. लवकरच काम होईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर शंकर हा लक्ष्मणच्या संपर्कात होता.  वेळोवेळी लक्ष्मण शंकरला कधी नेव्हिच्या चिल्का गेट, नेव्हीनगर, नारायणनगर, घाटकोपर येथील कार्यालयाबाहेर विश्वास पटवा म्हणून बोलवायचा. त्यानंतर काम कुठपर्यंत झाल आहे. ते पाहून येतो असे सांगून नेव्हीच्या कार्यालयात जायचा. पून्हा आल्यावर काम अंतिम टप्यात असून एका वरिष्ठ अधिकार्याची सही बाकी आहे असे सांगायचा.  काम लवकर होण्यासाठी वेळोवेळी लक्ष्मणने शंकरकडून साडेनऊ लाख उकळले.

अचानक एक दिवशी लक्ष्मण खोली सोडून पळून गेल्याची माहिती शरद पवार यांना कळाली. त्यांनी तातडीने शंकर आणि आनंदा यांना त्याची कल्पना दिली. लक्ष्मणचा फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शंकरने नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.  याच दरम्यान लक्ष्मणला नाशिक इगतपूरी येथे फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. लक्ष्मणच्या घणसोली येथील घरातून पोलिसांनी नेव्हीचा ड्रेस, बनावट ओळखपत्रही हस्तगत केले आहेत. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -  
संबंधित विषय
ताज्या बातम्या