कमला मिलचा पार्टनर रमेश गोवानीला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी


कमला मिलचा पार्टनर रमेश गोवानीला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील आग प्रकरणात कमला मिलचे संचालक रमेश गोवानी यांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सोमवारी चेंबूर येथून अटक केली. त्यानंतर मंगळवारी गोवानी यांना शिवडी न्यायालयापुढं हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

परिसरात अनिधकृत बांधकाम झाल्याचं गोवानी यांना माहित असून देखील त्यांनी हे बांधकाम रोखण्यासाठी कोणतंही पाऊल न उचलल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचं कळत आहे. मिल परिसरातील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीनंतर पोलिसांनी गोवानी यांचा जबाब नोंदवला होता.


तपासात निष्पण्ण

कमला मिल कंपाऊंड आगीचा अहवाल नुकताच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात कमला मिलचे संचालक रमेश गोवानी आणि त्यांचे पार्टनर रवी सूरजमल भंडारी यांनी मिल परिसरात अनेकांना भाड्याने जागा दिल्याचं तपासात पुढं आलं आहे.


अटक का?

या पूर्वी पोलिसांनी अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, हुक्का पार्लरचं कंत्राटदार उत्कर्ष पांडे आणि कमला मिलमधील पार्टनर रवी सूरमल भंडारीला अटक केली होती. पाटील यांनी पबच्या जागेची पाहणी न करताच पबला अग्निप्रतिबंधक परवानगी दिली होती. पांडेकडे हुक्काचं कंत्राट होतं. तर रवी भंडारी आणि रमेश गोवानी या मालकांना पोलिसांनी अनधिकृत बांधकामाना परवानगी दिल्याबाबत अटक केल्याचं कळत आहे.


अन्य जणांचाही सहभाग

तपासात गोवानी यांचं नाव स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्यांना सोमवारी अटक केली. मंगळवारी गोवानी यांना शिवडी न्यायालयात आणलं असता न्यायालयाने रमेशला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अन्य जणांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून पोलिस तपास करत असल्याचं अतिरिक्त सह पोलिस आयुक्त जयकुमार यांनी सांगितलं.



हेही वाचा-

कमला मिल आग: अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांना अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा