तटरक्षक दलाने वसईजवळच्या समुद्रात १६ बांग्लादेशींना पकडलं


तटरक्षक दलाने वसईजवळच्या समुद्रात १६ बांग्लादेशींना पकडलं
SHARES

भारतात बेकायदेशीररित्या दाखल होणाऱ्या १४ संशयीत बांग्लादेशी नागरिकांना तटरक्षक दलाने पाठलाग करुन पकडल्याची घटना शनिवारी वसईनजीकच्या समुद्रात घडली. तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेले आरोपी वसई पोलिसांच्या हवाली केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.


संशयास्पद हालचाली

तटरक्षक दलातील जवान आपल्या सजग मोहिमेंतर्गत समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवून असताना त्यांना पाणजू बेटानजीक ६ बोटी संशयास्पदरित्या हालचाल करत असल्याचं आढळून आलं. त्यानुसार तटरक्षक दलाने त्यांच्याकडे जाण्यास सुरूवात केली असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग सुरू केला. या ६ पैकी २ बोटींवरील १४ जण तटरक्षक दलाच्या हाती लागले. तर ४ बोटींतील आरोपी बोटी किनाऱ्यावर सोडून तिवराच्या जंगलात पसार होण्यास यशस्वी ठरले.


बांग्लादेशी देहबोली

तटरक्षक दलाने संशयीत बांग्लादेशींची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ओळखपत्रं, बोटीची नोंद असलेली कागदपत्र मिळाली नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या भाषेवरून ते बांग्लादेशी वाटत असल्याने कोस्टगार्डने या आरोपींचा ताबा वसई पोलिसांकडे दिला. याप्रकरणी आता वसई पोलिस अधिक तपास करत आहे. तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


हे आहेत आरोपी

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये आबिल शेख (२५), शफीकुल (२७),आहाजित (३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी.शेख (२२), शैफुल (२७), एन मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) यांचा समावेश आहे.



हेही वाचा-

दिवसा चालवायचा टॅक्सी, रात्री करायचा घरफोड्या

बालकांच लैगिक शोषण करणाऱ्याला आता मृत्यूदंड, 'पाॅक्सो' कायदा झाला आणखी कठोर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा