घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या


घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या
SHARES

घाटकोपरमध्ये फेसबुकवरील पोस्टवरून झालेल्या वादातून एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. मनोज दुबे असं मृत या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षातील सुनिल दुबे, उमेश सिंह आणि आकाश शर्मा या तिघांना ताब्यात घेतलं आहे.


यावरून वाद विकोपाला

घाटकोपरच्या असल्फा विभागात राहणाऱ्या दुबे यांच्या फेसबुक पोस्टवर भाजप पदाधिकाऱ्यांकडून टीकात्मक मजकूर टाकण्यात आला होता. या मजकुरात काँग्रेसचे आमदार नसीन खान यांच्या विषयी टिप्प‌णी केली होती. यावरन दुबे हे आरोपींना पोस्ट रद्द करण्यासाठी समजावत होते. यावरून तो वाद विकोपाला गेला. फेसबुकवरील हे भांडण कालांतराने फोनवर शिवीगाळ घालण्यापर्यंत पोहचलं. त्यातून दोघेही एकमेकांसमोर आले. घाटकोपरच्या असल्फा विलेजमध्ये आरोपींनी दुबे यांना मारहाण केली.


जागेवरच बेशुद्ध

या मारहाणीत दुबे गंभीर जखमी झाल्याने जागेवरच बेशुद्ध पडले. दरम्यान उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा - 

भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेना मोदींविरोधात फक्त अग्रलेख लिहिते- ओवेसी

उद्धव यांच्या अयोध्या वारीसाठी मनसेच्या शुभेच्छा! पण...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा