Advertisement

निकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला

यंदाच्या निवडणूकीत महायुती पूर्णतहा ताकदीने लढताना पहायला मिळाली. मात्र महाआघाडीत काॅग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काॅग्रेस विशेषता शरद पवार यांनी विरोधकांना घामच आणला.

निकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला
SHARES
Advertisement

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास उरले असताना, सर्वच स्तरातून निकालाबाबतचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेसने उभे केलेल्या उमेदवारांच्या अंतर्गत सर्व्हेत त्यांच्या पक्षाचे ३५ ते ५० इतकेच आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तवत निकालापूर्वीच पराभव स्विकारल्याचे दिसून येते.  

राज्यभरात झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत सर्वच एक्झिट पोलने महायुतीच्या बाजूने निकाल दिला. एक्झिट पोल्समधून भाजप आणि शिवसेनेला मोठा विजय मिळणार असे भाकीत अनेक राजकिय विश्लेषकांनीही वर्तवले. त्यात सर्वच पक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांचा अंतर्गत सर्व्हेही केले. यंदाच्या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने लढताना पहायला मिळाली. मात्र महाआघाडीत काँग्रेसपेक्षा  राष्ट्रवादी काँग्रेस विशेषता शरद पवार यांनी विरोधकांना घामच आणला.

भाजपच्या अंतर्गत सर्वेत महायुतीला २२० हून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवला. मात्र काँग्रेसच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसने ८९ जागांवर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवल्या खऱ्या. मात्र त्यापैकी काँग्रेसला फक्त ३५ ते ५० यश मिळेल असे, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आले आहे.  त्यामुळे निकालापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.हेही वाचा  - 

‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा

‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका
संबंधित विषय
Advertisement