Advertisement

‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा

एक्झिट पोल्सनी मनसेला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवलेला असताना ‘पोल डायरी’ या एकमेव एक्झिट पोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाचं भाकीत केलं आहे.

‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा
SHARES

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तात्काळ एक्झिट पोलचे आकडे सादर करण्यात आले. यातील बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना महायुतीला झुकतं माप दिलं असून महायुतीच सत्तेत येणार असं म्हटलं आहे. या एक्झिट पोल्सनी मनसेला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवलेला असताना ‘पोल डायरी’ या एकमेव एक्झिट पोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाचं भाकीत केलं आहे.

मनसैनिक नाराज

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गाजवली ती आपल्या अनोख्या प्रचारसभांनी. मला सक्षम विरोधी पक्ष बनवा असं आवाहन यंदा राज ठाकरे यांनी मतदारांना करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मनसेने या निवडणुकीत १०४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. परंतु एक्झिट पोलमध्ये मनसेला एकही जागा न दाखवल्याबद्दल मनसैनिक नाराज झाले आहेत.

चुरशीची लढाई 

परंतु ‘पोल डायरी’ या एकमेव एक्झिट पोलने विधानसभा निवडणुकीत मनसेला १ ते ५  जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. एवढंच नाही, तर २५ जागांवर पक्ष चुरशीची लढाई देईल, असंही म्हटलं आहे. 

 ‘पोल डायरी’चा अंदाज  

  • भाजपाला १२१ ते १२८ जागा
  • शिवसेनेला ५५ ते ६४ जागा
  • काँग्रेस ३९ ते ४६ जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ ते ४२ जागा
  • मनसेला १ ते ५ जागा, २५ जागांवर चुरशीची लढाई 
  • वंचित बहुजन आघाडीला १ ते ४ जागा  



हेही वाचा-

Exit Polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत

Exit Polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा