Advertisement

Exit polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Exit polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत
SHARES

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

एक्झिट पोल्सच्या बहुतांश सगळ्याच निकालांमध्ये पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजप १६४ जागांवर तर शिवसेना १२४ जागांवर लढली. शिवाय भाजपने मित्रपक्षांनाही आपल्याच चिन्हावर निवडणूक लढण्यास भाग पाडलं. यामुळे भाजपच्या किती जागा येणार? भाजप एकहाती बहुमताचा आकडा गाठणार का? तसं झाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा मिळणार का याकडे? सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पर्यायच नाही

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने राऊत यांना प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले की,

भाजप-शिवसेना महायुती यंदा २०० च्या वर जागा मिळवेल, हे सांगायला कुठल्याही एक्झिट पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही. आम्ही १२४ जागा लढलो त्यापैकी १०० पेक्षा जास्त जागा आम्ही सहज जिंकू. भाजपाला देखील जास्त जागा मिळतील हे मान्य करायला काहीच हरकत नाही. असं असलं तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं महत्त्व कमी होणार नाही. कारण राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाही, असं राऊत म्हणाले. 

सत्तेत वाटा मिळणारच   

शिवसेनेला सत्तेत वाटा मिळणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, २०१४ मध्ये कोणतीही युती नसताना आम्ही निवडणूक लढली. तर आता एकत्र येऊन आम्ही लढलो. आमची अवस्था ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना’ अशी आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही. शिवसेना नक्कीच सत्तेत राहील. शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं कुणालाही शक्य नाही. उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल. निकालानंतर फक्त विरोधी पक्ष कोण हेच ठरायचं असेल, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

 शिवसेनेचा मुख्यमंत्री

आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत विचारलं असता, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे. शिवसेनेचे सर्व नेते यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहतील. आमचा उद्धव ठाकरे यांचा शब्द, डावपेच, आत्मविश्वास यावर खूप विश्वास असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

 


हेही वाचा-

Exit Polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील

Exit Polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा