Advertisement

‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्य्रातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी भलेही माझा उल्लेख माहेरवाशीण बहिण असा केला असला, तरी असा भाऊ कुणालाही नको, अशी टीका शिवसेनेची उमेदवार दिपाली सय्यद हिने केली.

‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्य्रातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी भलेही माझा उल्लेख माहेरवाशीण बहिण असा केला असला, तरी असा भाऊ कुणालाही नको, अशी टीका शिवसेनेची उमेदवार दिपाली सय्यद हिने केली. 

सासरी पाठवणी

शिवसेनेने दिपाली सय्यद यांना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कळवा-मुंब्य्रातून उमेदवारी दिली आहे. आपल्या प्रचारादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी दिपाली सय्यद यांचा माहेरवाशीण बहिण असा उल्लेख केला होता. तसंच काही दिवस खाऊपिऊ घालून तिची पुन्हा सासरी पाठवणी करणार असल्याचंही आव्हाड म्हणाले होते.  

लपलेला अभिनेता

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, मी प्रचारात व्यस्त असल्याने आव्हाडांच्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. परंतु जितेंद्र आव्हाडांमध्ये एक अभिनेता लपलेला असून ते दाखवण्यासाठीच ते कॅमेऱ्यापुढं आले की गाणं गातात. त्यांनी मला बहिण मानलं असलं, तरी असा भाऊ कुणालाही नको. 

आव्हांडांच्या विरोधात मी १०० टक्के जिंकणार असून किमान २० हजारांच्या मताधिक्याने मी निवडून येईन, असा मला विश्वास आहे. 



हेही वाचा-

Exit Polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत

Exit Polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा