फेसबुकवर कपल चॅलेंज स्वीकारताय?, पोलिसांनी व्यक्त केली 'ही भीती

फेसबुक सुरू केलं की, कपल चॅलेंजचे फोटोज समोर येत आहेत. पण आता पुणे पोलिसांनी अशा कपल्सना इशारा दिला आहे.

फेसबुकवर कपल चॅलेंज स्वीकारताय?, पोलिसांनी व्यक्त केली 'ही भीती
SHARES

सोशल मीडियावर सध्या कपल चॅलेंजचा ट्रेंड चांगलाच सुरू आहे. यूजर्स आपल्या बेटर हाफची फोटोज फेसबुकवर शेअर करत आहेत. फेसबुक सुरू केलं की, कपल चॅलेंजचे फोटोज समोर येत आहेत. पण आता पुणे पोलिसांनी अशा कपल्सना इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर कपलनं फोटो टाकण्यापूर्वी विचार करावा. कारण या फोटोंचा चुकिचा वापर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या फोटोंचे मॉर्फ बनवून अश्लील आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी याचा वापर होऊ शकतो. पुष्टी न झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २ दशलक्षाहूनही अधिक लोकांनी कपल चॅलेंज स्वीकारले आहे.

पोलिसांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, 'आपल्या पार्टनरचा फोटो शेअर करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत तर एक 'क्यूट' चॅलेंज तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते.' या मॅसेजसोबत एक पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. यावर लिहिले आहे की, 'कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनलला चॅलेंज नका करू, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल. या फोटोंचा वापर मॉफिंग, बदला घेणे, पोर्न आणि सायबर क्राइमसाठी केला जाऊ शकतो'



हेही वाचा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार चौकशी

दिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा