कोरोनामुळे ड्रग्ज तस्कर ही तोट्यात, विमानसेवा बंद झाल्याचा परिणाम

यापूर्वी आफ्रीकी व दक्षिण अमेरिकन देशातील नागरीकांचा तस्करीसाठी वापर केला जायचा. आता मालावियन, गिनी प्रजासत्ताक यासारख्या देशांतील नागरीकांचा वापर केला जात आहे.

कोरोनामुळे ड्रग्ज तस्कर ही तोट्यात, विमानसेवा बंद झाल्याचा परिणाम
SHARES

मुंबईत लाँकडाऊनमध्ये नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये यासाठी पोलिसांनी चौका चौकात नाकाबंदी करून रस्ते अडवल्यामुळे ड्रग्ज तस्करांचे चांगलेच वांदे झाले. त्यामुळे लाँकडाऊनमधील तोटा भरून काढण्यासाठी तस्करांच्या हालचाली वाढल्या असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तस्करांनी आता तस्करीतील ड्रग्सचा साठा वाढवला असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचलनालयातील(डीआरआय) सूत्रांनी दिली.

हेही वाचाः- शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या...

लॉकडाऊनमुळे अनेक देशांनी विमान प्रवासावर बंदी घातली आहे. अनेक देशांमध्ये तुरळक प्रमाणात विमान वाहतुक सुरू आहे, तर काही देशांमध्ये अद्याप विमान वाहतुक पूर्वपदावर आलेली नाही. त्याचा फटका ड्रग्स तस्करांवर पडला असून त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तस्करीतील ड्रग्सचा साठा वाढवला आहे. त्याशिवाय त्यांच्या मोड्स ऑपरेंडीमध्येही बदल झालेला आहे. यापूर्वी आफ्रीकी व दक्षिण अमेरिकन देशातील नागरीकांचा तस्करीसाठी वापर केला जायचा. आता मालावियन,  गिनी प्रजासत्ताक यासारख्या देशांतील नागरीकांचा वापर केला जात आहे. तसेच कार्गोचाही मोठाप्रमाणात वापर करण्यात येत आहे. यावेळी या तोटा भरून काढण्यासाठी एकावेळी पाठवण्यात येणा-या ड्रग्सच्या साठ्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्याभरात चार कारवायांमध्येच डीआरआयने २४ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. तसेच अेक देशांमध्ये प्रवासी विमान वाहतुकीवर कडक निर्बंध असल्यामुळे छोट्या प्रमाणातील ड्रग्ससाठी कुरियर व मोठ्या साठ्यासाठी सागरी मार्गाचा वापर होत असल्याचे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिका-याने स्पष्ट केले.

हेही वाचाः- वर्षभरानंतर पुन्हा पवार-राऊत भेट, चर्चांना उधाण

याशिवाय वैद्यकीय सेवेसाठी परदेशी जाण्याच्या नावाखालीही तस्करी करण्यात येत आहे. त्यासाठी गरीब व गरजू व्यक्तींचा शोध करून कमी पैशांमध्ये त्यांच्याकडून हे काम केले जाते. त्याला अनेक जण बळीही पडतात. कधीकधी खरच आजारी व्यक्तीलाही त्याच्या उपचाराच्या खर्चाच्या नावाखाली तस्करीत वापर केला जात असल्याचेही या अधिका-याने स्पष्ट केले

संबंधित विषय