कोरोना रुग्णाने पाचव्या माळ्यावरून उडी टाकून केली आत्महत्या

दोन दिवस क्वाॅरन्टाइन सेंटरमध्ये राहिल्यानंतर त्याने रविवारी दुपारी सेंटरच्या पाचव्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली.

कोरोना रुग्णाने पाचव्या माळ्यावरून उडी टाकून केली आत्महत्या
SHARES

मुंबईच्या जवळ भिंवडी येथे एका ४३ वर्षीय कोरोना रुग्णाने पाचव्या माळ्यावरून उडी टाकत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भिवंडीच्या राजनोली परिसरात हे कोरोना सेंटर होते. या घटनेबाबत भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती डोंबिवलीचा राहणारा होता. त्याला१७ जुलै रोजी या कोरोना सेंटरमध्ये भर्ती करण्यात आले होते. 

डोंबिवली परिसरातराहणारा प्रशांत आंबेकर याची १७ जुलै रोजी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली होती. त्याला कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्वाॅरन्टाइन सेंटरमध्ये ठेवले होते. दोन दिवस क्वाॅरन्टाइन सेंटरमध्ये राहिल्यानंतर त्याने रविवारी दुपारी सेंटरच्या पाचव्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी प्रशांतची क्वारन्टाइन सेंटरमध्ये काम करणाऱ्या वार्ड बाॅयसोबत भांडणं झाली होती. त्यानंतर त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतले होते.  त्यानंतर तपासणीसाठी त्याला डाॅक्टरांकडे नेले होते. तेथून परतल्यानंतर प्रशांत पून्हा त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने म्हणजेच दुपारी ४.३० वा. त्याने खोलीच्या खिडकीतून उडी टाकत आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याचे कळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांतने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ठ झालेले नाही. मात्र कोरोनाच्या भितीनेच त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिस डाॅक्टर, वार्ड बाॅय आणि तेथे उपस्थित असलेले इतर रुग्णांचे ही जबाब नोंदवत आहेत. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा