नायर रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

कोरोनाबाधित 29 वर्षीय महिलेने नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नायर रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या
SHARES

कोरोनाबाधित  29 वर्षीय महिलेने नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  बुधवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये या महिलेने गळफास घेतला.  

वरळीच्या जिजामाता नगरमध्ये त्या राहत होत्या. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नायर रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक २५ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. १५ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांनी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. कोरोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला दम्याचा आजार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते. मात्र, या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यापासून तिला नैराश्य आलं होतं. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. याआधी नाशिकमध्ये एका गृहस्थानं करोना झाल्याच्या नुसत्या संशयावरून आत्महत्या केली होती. तर, नगरमधील अकोले येथे एकानं रुग्णालयात स्वत:ला संपवलं होतं.



हेही वाचा -

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा