कोरोनाचा धोका वाढला ! राज्यात दिवसभरात ५१२ जणांचा कोरोनाने मृत्यू

. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

कोरोनाचा धोका वाढला ! राज्यात दिवसभरात ५१२ जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी लक्षणिय वाढ झाली. राज्यात आज दिवसभरात तब्बल २० हजार ४८२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ५१२ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

हेही वाचाः- मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल

राज्यात अनलॉक ४ ला सुरवात झाली असताना, दिवसभरात कोरोनाचे २० हजार ४८२ नवे रुग्ण सापल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर दिवसभरात ५१२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच वेळी नोंदवल्या गेलेल्या एवढ्या मोठ्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता १०,९७,८५६ इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या ७,७५,२७३ जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३०४०९ जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत (१०,९७,८५६) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या २,९१, ७९७ रुग्णांचाही समावेश आहे.

हेही वाचाः- IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

दरम्यान, संपूर्ण राज्यासह राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातही कोरोना व्हायरस संकटाचे प्रमाण नियंत्रणात कायम आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित १५४५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४९ जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्या १७१७ जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली. मुंबई शहारातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या १,७३,५३४ इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या ३०८७९ डिस्चार्ज मिळालेल्या १,३४,०६६ आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८२२७ जणांचाही समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा