विवेक ओबेरॉयच्या पत्नीला क्राईम ब्रँचची नोटीस

विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

विवेक ओबेरॉयच्या पत्नीला क्राईम ब्रँचची नोटीस
SHARES

सेंट्रल क्राईम ब्रांचनं बंगळुरूमधील सॅडलवुड ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाचंही नाव समोर आलं आहे. आदित्यला पोलिसांनी नोटीस बजावला होती. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

प्रियंका अल्वा हिला देखील नोटीस बजावली आहे. प्रियंका आणि आदित्य दोघे बहीण-भाऊ आहेत. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणात तिचाही हात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आता प्रियंका अल्वाची देखील चौकशी केली जाणार आहे.

आदित्यचा शोध घेण्यासाठी बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा मारला. विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. सीसीबीनं कोर्टाचं वॉरंट घेऊन विवेकच्या घराची झडती घेतली होती. आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.

ड्रग्स प्रकरणात काही अभिनेत्रिंची देखील नावं आहेत. अभिनेत्री रागिणी द्विवेदी, रविशंकर, शिवप्रकाश, राहुल शेट्टी आणि वीरेन खन्ना या ड्रग पेडलर्सला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. रागिणीनं ड्रग्ज चाचणीच्या वेळी मूत्रामध्ये पाणी मिसळून नमुना खराब करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिचा नमुना पुन्हा घेतला आहे.हेही वाचा

ड्रग्ज तस्करांविरोधात मुंबई पोलिसांची धारावीत मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींवर चित्रपट बनवणा-या सहनिर्मात्याला धमकी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा