अमेरिकन नागरिकांना ३८ लाखांचा गंडा

दहिसर परिसरात राहणारा आरोपी तौफीक शेख आणि त्याचे साथीदार हे अमेरिकेतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करायचे. संगणकाच्या माध्यमातून त्यानं अमेरिकेतील नागरिकांचे संगणक हॅक केले होते. त्यानंतर संगणकात व्हायरस असल्याचं सांगून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात पैसे उकळायचा.

अमेरिकन नागरिकांना ३८ लाखांचा गंडा
SHARES

मुंबईतून कॉल सेंटरच्या माध्यमातून ५३ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तौफीक शेख  या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नुकतंच त्यानं एका अमेरिकन नागरिकाला ३८ लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.


अमेरिकेतील संगणक हॅक

दहिसर परिसरात राहणारा आरोपी तौफीक शेख आणि त्याचे साथीदार हे अमेरिकेतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करायचे. संगणकाच्या माध्यमातून त्यानं अमेरिकेतील नागरिकांचे संगणक हॅक केले होते. त्यानंतर संगणकात व्हायरस असल्याचं सांगून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात पैसे उकळायचा. मागील अनेक महिन्यांपासून कॉल सेंटरच्या नावाखाली ही टोळी गोरख धंदा करत होती. या टोळीनं नुकतंच अमेरिकेतील नागरिकांची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॉल सेंटरच्या भागीदार तरुणाला अटक केली. अंधेरीतील कॉल सेंटरप्र करणात आरोपीचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं. 


५ जणांना यापूर्वी अटक

आरोपी तौफीक हा दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.. आरोपींनी ५३ अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीनं अमेरिकन डॉलरचे भारतीय चलनात रुपांतर केले असत्याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वी याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा

भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा