लग्नासाठी तरूणीवर बळजबरी करणारा अटकेत


लग्नासाठी तरूणीवर बळजबरी करणारा अटकेत
SHARES

कॉलेजला जाणाऱ्या तरुणीवर भर रस्त्यात लग्नासाठी बळजबरी करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. हा तरूण तिच्या नातेवाईकांपैकीच असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय.

जोगेश्वरी परिसरात राहत असलेेली 17 वर्षीय तरुणी सोमवारी नेहमीप्रमाणे ओशिवरा इथल्या नाईट कॉलेजला जात होती. त्याचवेळी आरोपीनं येऊन तिची वाट अडवली आणि लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीनं लग्नासाठी साफ नकार दिला. यापूर्वी देखील आरोपीनं अनेकदा तरुणीला लग्नासाठी विचारलं होतं. मात्र तरुणी तिच्या निर्णयावर ठाम होती.

तरुणी वारंवार नकार देत असल्यानं आरोपीला राग अनावर झाला. आरोपीनं तरुणीला जबरदस्ती रिक्षात बसवून आझादनगर इथल्या मेट्रो स्थानकाजवळ आणलं. त्यानंतर तो पुन्हा तिच्याशी वाद घालू लागला. लग्नाची मागणी मान्य करावी यासाठी त्यानं तिचाशी गैरवर्तवणूक देखील केली. प्रसंगावधान साधत तरूणीनं आरडाओरडा करून आपली सुटका करून घेतली. घडलेला प्रकार तिनं तिच्या घरच्यांना सांगितला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसात तरुणीनं तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३५४, ३५४(ड), ३६३ भा. द. वि कलमासह ८, १२ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


हेही वाचा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सीसीटीव्हीचं जाळं आता आणखी मजबूत

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा