मोबाइलच्या जागी साबणाची वडी


मोबाइलच्या जागी साबणाची वडी
SHARES

आॅनलाईन शाॅपिंगच फॅड जसं वाढत चाललंय तसंच आॅनलाइन शाॅपिंग करताना फसवणूक होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. बुधवारी याचाच प्रत्यय दादरच्या सिराज खान यांना आला. दहावीत चांगल्या मार्काने पास झालेल्या मुलीला भेट म्हणून मागवलेल्या मोबाइलच्या जागी चक्क साबणाची वडी मिळाल्याने त्याच्या आनंदावर विरजण पडलं.


कसा मागवला मोबाइल?

शिवडी परिसरात राहणाऱ्या सिराज यांचा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने परिस्थिती नसतानाही ते त्यांच्या मुलीला शिकवत आहे. नुकतीच त्यांची मुलगी दहावीत पास झाली. तिला ८५ टक्के मिळाल्याने सिराज आनंदात होते.



बाॅक्समध्ये साबण

मागील अनेक दिवसांपासून त्याची मुलगी मोबाइलसाठी हट्ट धरून होती. त्यामुळे सिराज यांनी मुलीसाठी १६ हजार ६७५ रूपयांचा श्योमी नोट ५ प्रो मोबाइल फोन आॅर्डर केला आणि आॅनलाइन पेमेंट देखील केलं. बुधवारी ठरल्याप्रमाणे मोबाइल आला खरा; पण बाॅक्स उघडल्यावर आत चक्क साबणाची वडी होती.


पैसे परत मिळणार

मोबाइल आणणाऱ्या मुलाला विचारलं असता त्याला देखील यासंबधी काही माहिती नव्हती. याप्रकरणी सिराज यांनी आॅनलाइन कंपनीकडे तक्रार केली आहे. त्यावेळी कुरिअर कंपनीने त्यांना पैस परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणी सिराज यांनी शिवडीच्या आर.ए.किडवाई पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.



हेही वाचा-

पतीला विकत देते का? प्रेयसीने देऊ केले पैसे

रेल्वेची कॅश लुटणारी टोळी गजाआड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा