मुंबईतील हाॅटेलात आढळला 'या' खासदाराचा मृतदेह

मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील हाॅटेलमध्ये दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर (५९) यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईतील हाॅटेलात आढळला 'या' खासदाराचा मृतदेह
SHARES

मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील हाॅटेलमध्ये दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर (५९) यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादरा- नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे मरीन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले असून त्यांनी चौकशीला सुरूवात केली आहे. 

डेलकर यांच्या मृतदेहाजवळ जी सुसाइड नोट सापडली आहे, ती गुजरातील भाषेतून लिहिलेली आहे. ही सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या सुसाइड नोटमधून त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप त्यात काय लिहिलं आहे, हे पोलिसांनी सांगितलेलं नाही. 

डेलकर यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर व दोन मुलं अभिनव व दिविता असा परिवार आहे.

कोण होते डेलकर?

मोहन डेलकर हे १९८९ मध्ये पहिल्यांदा दादरा हवेलीचे खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. त्यानंतर डेलकर २००४मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाच्या तिकीटावर ते निवडून आले होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, २०१९ मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवत ते जिंकून आले होते. २०२०मध्ये त्यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता.

(dadra and nagar haveli mp mohan delkar found dead in marine drive mumbai hotel)


हेही वाचा-

हॉटेल विलगीकरणातून झाले पसार, दुबईहून आलेल्या चौघांवर गुन्हे

भाजपचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आलं सत्य समोर


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा