हॉटेल विलगीकरणातून झाले पसार, दुबईहून आलेल्या चौघांवर गुन्हे

परदेशातून भारतात येणाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईन राहणं अनिवार्य आहे. दुबईतून चारही प्रवासी १० फेब्रुवारीला मायदेशी आले होते.

हॉटेल विलगीकरणातून झाले पसार, दुबईहून आलेल्या चौघांवर गुन्हे
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत चालले आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेकडून कडक कारवाई केली जात आहे. हाॅटेल विलगीकरणातून पळून गेलेल्या चार प्रवाशांवर मुंबई पालिकेने गुन्हा दाखल केला आहेत. हे प्रवासी दुबईहून मुंबईत दाखल झाले होते. 

परदेशातून भारतात येणाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईन राहणं अनिवार्य आहे. दुबईतून चारही प्रवासी १० फेब्रुवारीला मायदेशी आले होते. अंधेरीतील एका हॉटेलमध्ये त्यांना  ७ दिवसांच्या इन्स्टिट्यूशल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं.  मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर हॉटेलमध्ये चारही प्रवाशांची तपासणी करण्यासाठी गेले असता ते हॉटेलमधून गायब झाले होते.सात दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करण्याच्या चौघे हॉटेलमधून पळून गेले होते. त्यांच्यावर अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सुशील सबनीस (अंबरनाथ), जुबेर मोहम्मद घालते (सुरोली, मुरुड रायगड), स्वपन चंद्रदास (खडे गोलोली कल्याण), निकीता चंदर (उल्हासनगर ) अशी या चोघांची नावे आहेत. चौघांविरोधांत अंधेरी पोलिसांनी १८८, २६९, २७० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा