बदलापूरात फ्लॅटमध्ये आढळला सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह

रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास गुड्डू सिंह यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवलं.

बदलापूरात फ्लॅटमध्ये आढळला सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह
SHARES

बदलापूरमध्ये एका प्लॅटमध्ये सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. गुड्डू सिंह असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते मूळचे दिल्ली येथे राहणारे असून पत्नीसोबत तीन दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस तपास करत आहेत. 

रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास गुड्डू सिंह यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.  त्यावेळी त्यांना गुड्डू सिंह यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. गुड्डू यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील मुंबईत आल्या होत्या. मात्र, पोलिसांना त्यावेळी त्यांच्या पत्नी कुठेही दिसल्या नाहीत. पोलिसांना एक वेगळा संशय आला असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

गुड्डू हे गेल्या काही वर्षापूर्वी नौदलातून सेवा निवृत्त झाले आहेत. ते आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली येथे राहत होते. त्यांनी काही वर्षापूर्वी बदलापूर परिसरात एक प्लॅट खरेदी केला होता. हाच प्लॅट विकण्यासाठी गुड्डू सिंह गेतीन दिवसांपूर्वी पत्नीसह मुंबईत आले होते.हेही वाचा -

१२ कोटींचं हेरॉइन जप्त, दोघांना अटक

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग, एकाला अटक
संबंधित विषय