बुली बाई अॅप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ला पोलिसांच्या IFSO युनिटनं आसाममधून अटक केली आहे. डीसीपी केपीएस मल्होत्रा यांच्या पथकानं आसाममधून अटक केली आहे. या आरोपीचं नाव नीरज असून हा गिथहब (Githhub) वरून अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजनं बुली बाईला गिथहब अॅपद्वारे बनवले होते. आरोपी नीरज बिश्नोई हा २१ वर्षांचा आहे. दिल्ली पोलीस आसामहून आरोपीसह दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दुपारी 3.30 पर्यंत विमानतळावर पोहोचेल.
यापूर्वी, दिल्ली महिला आयोगानं 'बुली बाई' आणि 'सुली डील' अॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितलं आहे.
दिल्ली महिला आयोगानं सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 'गिटहब' अॅपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली. आयोगानं दिल्ली पोलिसांना हजर राहून 'सुली डील' आणि 'बुली बाई' प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितलं.
दिल्ली महिला आयोगानं जारी केलेल्या आवेदनात म्हणलं आहे की, ''अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक न होणं हे अस्वस्थ करणारं आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या या भूमिकेमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री आणि इतरांना शिक्षा झालेल्यांचे मनोबल वाढले आहे."
काही अज्ञात लोकांच्या गटानं 'गिटहब' वापरून शेकडो मुस्लिम महिला आणि मुलींचे मॉर्फ केलेले फोटो एका अॅपवर अपलोड केले आहेत आणि ते 'बुली डील ऑफ द डे' म्हणून शेअर केले आहेत, असंही निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा