बुली बाई अॅप प्रकरणी आणखी एकाला अटक

बुली बाय अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.

बुली बाई अॅप प्रकरणी आणखी एकाला अटक
SHARES

बुली बाय अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधील कोटाद्वार इथून एका तरुणाला अटक केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मयंक रावत असं तरुणाचं नाव आहे. हा तरुण दिल्लीच्या झाकीर हुसेन कॉलेजमध्ये बीएससीचा विद्यार्थी आहे. या तरुणानं त्याच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केल्याच्या सांगण्यात येत आहे.

बुल्लीबाई अॅप प्रकरणी आतापर्यंत उत्तराखंडमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रुद्रपूर इथून तरुणीला तर कोटाद्वार इथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाला मुंबईच्या पश्चिम सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमर कमले यांनी अटक केली आहे.

कोतवाल विजय सिंह यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यानं सांगितले की, मुंबई पोलिसांच्या पथकानं मंगळवारी रात्री दीड ते अडीच वाजेपर्यंत निंबुचौर इथं छापा टाकून तरुणाला त्याच्या घरातून अटक केली. मुंबई पोलीस मयंक रावतला स्थानिक न्यायालयात हजर करणार आहेत. तिथून पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडनंतर मुंबईला घेऊन जाणार आहेत.

बुली बाय अॅप प्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी मंगळवारी उधम सिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर इथून एका तरुणीला अटक केली होती.

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी होत असल्याचा आवाज सर्वप्रथम शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उठवला होता. त्यांनी बुली अ‍ॅपला बंदी घालण्याची मागणी केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना देखील यासंबधी लवकरात-लवकर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरुन केंद्रीय आयटी विभागानं बुली बाई या अ‍ॅप्सला ब्लॉक केलं आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री प्रियंका गांधींनी ट्विट करत अ‍ॅपला बंदी घातल्यात आल्याची माहिती दिली होती.


हेही वाचा

रेल्वे स्टेशनवर महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न

मालकाकडून नोकराची हत्या, दोघांना अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा