आरोपीनं चक्क पोलिस ठाण्याला दिले ५ स्टार,

कधी ऐकलंय का एखाद्या आरोपीनं पोलिस स्टेशनला स्टार दिल्याचं?

आरोपीनं चक्क पोलिस ठाण्याला दिले ५ स्टार,
SHARES

आपण एखाद्या रेस्टॉरंट, हॉटेलमधून जाऊन आलो की त्याला गुगलवर स्टार देतो. रेस्टॉरंट, हॉटेलच कशाला उबर, ओला, झोमेटो यांना देखील आपण स्टार देतो. एकप्रकारे त्यांची सर्विस कशी होती याची माहिती देतो. पण कधी ऐकलंय का पोलिस स्टेशनला स्टार दिल्याचं? पोलिस स्टेशनला स्टार द्यायला ते काय रेस्टॉरंट आहे, अशी प्रत्येकाची उत्तरं असतील.

पण एका पठ्ठ्यानं चक्क पोलिस स्टेशनलाच ५ स्टार दिले आहेत. ऐकायला विचित्र आहे पण हे खरं आहे. मुंबईतल्या मीरा-भाईंदर परिसरातील नवनगर पोलीस ठाण्यात पाच महिन्यांपूर्वी एका आरोपीला गुन्हा केला म्हणून तुरुंगात ठेवलं होतं. तिथून सुटून आल्यावर त्या गुन्हेगारानी इंटरनेटवर गुगल रिव्ह्यू लिहित त्या ठाण्याला ५ स्टार दिलेत.

आयपीएस संतोष सिंग यांनी या रिव्ह्यूचा फोटो ट्विट केला आहे. संतोष कुमार यांनी ट्विटमध्ये रिव्ह्यूमधलं वाक्य लिहिलंय, ‘पोलीस ठाणं इतकं चांगलंय की कुणालाही दुसऱ्यांदा तिथं यावंसं वाटेल.’ नंतर ते विचारतात आता याचं काय करायचं सांगा.

मन्सुरी आवेश असं या आरोपीचं नाव आहे आणि पाच महिन्यांपूर्वी तो तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलाय. गुन्हेगारानी असंही लिहिलंय की, "मला अटक झाली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. पोलिसांनी मला खूपच चांगली वागणूक दिली आणि तुरुंगही मस्त होता. पोलीस अधिकारी प्रेमळ होते. शेवटी त्यानी लिहिलंय जर त्याला संधी दिली तर त्याला पुन्हा स्टेशनमध्ये यायला आवडेल."हेही वाचा

मुलानेच बापाला फसवून काढले कोट्यावधी रुपयांचे कर्ज

अभिनेता अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा बजावला समन्स

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा