मुलानेच बापाला फसवून काढले कोट्यावधी रुपयांचे कर्ज


मुलानेच बापाला फसवून काढले कोट्यावधी रुपयांचे कर्ज
SHARES

मुंबईच्या बोरिवली परिसरात एका वृद्ध बापाच्या पश्च्यात मुलानेच बापाच्या नावावर कोट्यावधी रुपये कर्ज काढल्याची घटना घडली आहे. वयोवृद्ध वडिलांच्या नावावर असलेल्या दुकानांवर बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करून मुलानं सुमारे २ कोटी ५३ लाख रुपयांचा कर्ज काढलं. याची माहिती ज्या वेळी वडिलांना मिळाली. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. संतापलेल्या बापाने आता पोटच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार केली असून या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले

बोरिवली परिसरात राहणारे हस्तीमल जैन (७७) यांनी आयुष्यभर काबाड कष्ठ करून मुलांच्या भविष्याचा विचार करून मुंबईतील बोरीवली येथे मोक्ष प्लाझा येथे ३ व्यावसायिक गाळे घेतले होते. मुलांना व्यवसाय ही करता येईल आणि एकादं दुकान भाड्यावर दिल्यावर त्यातून येणाऱ्या भाड्याच्या पैशावर  वृद्धापकाळात आपला उदरनिर्वाह करता येईल, म्हणून हस्तीमल यांनी ही व्यवस्था करुन ठेवली होती. मात्र मुलगा प्रमोद लग्न झाल्यावर हस्तीमल यांच्यापासून वेगळा राहू लागला. पण, वडिलांनी व्यावसायिक गाळे घेतले असल्याचं प्रमोदला माहीत पडताच वडिलांनी हे गाळे आपल्याला व्यावसायाकरता द्यावे, यासाठी तगादा लावला होता. वाद नको म्हणून हस्तीमल यांनी ते व्यावसायिक गाळे प्रमोद याला व्यावसायाकरता दिले. पण, प्रमोद याच्या डोक्यात वेगळंच कारस्थान शिजत होतं. कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि प्रमोदने त्याचा गुन्हेगारी मनसुबा पूर्ण केला.

हेही वाचाः- अभिनेता अर्जुन रामपालला NCB ने पुन्हा बजावला समन्स

ॲागस्ट महिन्यात लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु झाल्या आणि हस्तीमल जैन त्यांच्या गावी राजस्थानला जैन पर्युषण करता गेले. हीच वेळ साधून प्रमोदने IDFC बॅंकेतून वडिलांच्या तिन्ही दुकानांवर तब्बल २ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज घेतलं. याकरता त्यानं वडिलांचे बनावट कागदपत्र आणि स्वाक्षरीच्या मदतीन बॅंकेतून कर्जही मंजूर करून घेतलं. लॉकडाऊन काळामध्ये काही दिवसांसाठी हस्तीमल जैन हे त्यांच्या पत्नीसोबत पर्युषणचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या गावी गेले होते. मात्र, परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या सदरचे गाळे सील करण्यात आल्याचं समजलं. त्यांनी मुलगा प्रमोद याला मुलाला फोन करून याबद्दल विचारले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला कोरोनामुळे व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान झाल्यामुळे लाईट बिल व मेंटेनेस भरता आलं नसल्यानं हे गाळे बंद करण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने त्यांना संगितले. मुलाचा सर्व प्रताप हस्तीमल जैन यांना समजताच त्यांनी चौकशी केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा