SHARE

डोंबिवलीच्या नांदिवली परिसरातील नाल्यात वाहून गेलेल्या तरूणाचा मृतदेह तब्बल ३ दिवसांनी गुरूवारी सापडला. हर्षद जिमकल असं या तरूणाचं नाव आहे. हर्षद मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळत असताना नाल्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला होता.


कुठे सापडला मृतदेह?

अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेत हर्षदचा मृतदेह ज्योतीनगर झोपडपट्टी परिसरात गुरूवारी आढळून आला.


नेमकं काय झालं?

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदिवलीतल्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. त्यावेळी हर्षद नाल्यात बुडत असल्याचं त्याच्या मित्रानं पाहिलं. मित्राला वाचवण्यासाठी त्यानेही नाल्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं दोघेही वाहून गेले. या दोघांना शोधण्यासाठी स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवलं.

तेव्हापासून अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी या दोघांचा युद्धपातळीवर शोध घेत होते. यापैकी हर्षदचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरूणाच्या मृतदेहाचा शोध सुरूच आहे.हेही वाचा-

मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग

घाटकोपरमध्ये कल्पतरु ऑरा सोसायटीची संरक्षक भिंत खचलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या