परळच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टर बेपत्ता


परळच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टर बेपत्ता
SHARES

मुंबईच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील २४ वर्षीय डाॅक्टर बेपत्ता झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली आहे. अजिंक्य योगेंद्र सिंग मोर्य असं या डाॅक्टरचं नाव आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


मानसिक तणावाखाली 

मुळचा जळगावच्या पाचोद्याचा राहणारा अजिंक्य मुंबईत केईएम रुग्णालयात कार्यरत होता.रुग्णालय परिसरात असलेल्या मुलांच्या होस्टेलमध्ये तो मित्रांसोबत राहत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून अजिंक्यची वागणूक बदलली होती. तो फारसा कुणाशी बोलत नव्हता. काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली दिसत होता. कामातही त्याचं फारसे लक्ष नव्हतं. सोमवारी सकाळी अजिंक्य नियमीतपणे रुग्णालयात गेला होता. सायंकाळी रुमवर परतल्यानंतर तो त्याचा मोबाइल, पर्स आणि इतर साहित्य न घेऊन जाताच बाहेर पडला. रात्री उशिर झाला तरी अजिंक्य रुमवर न परतल्याने त्याच्यासोबतच्या इतर डाॅक्टरांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र अजिंक्य सापडला नाही.


मूळ गावीही चौकशी 

या प्रकरणी अजिंक्यच्या मित्रांनीनी केईएमच्या अधिष्ठातांच्या कानावर ही बाब टाकून नायगावच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात अजिंक्य हरवल्याची तक्रार नोंदवली, अजिंक्यच्या मूळ गावीही चौकशी केली असून त्याच्या पालकांना तो बेपत्ता असल्याची कल्पना देण्यात आल्याची माहिती अजिंक्यच्या मित्राने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल भोईवाडा पोलिसांनी घेतली असून अजिंक्यचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा - 

'पोलिस दिदी अभियाना'मुळे बलात्कारी बाप अटकेत

'ते' स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा