डाॅ. पायल आत्महत्येप्रकरणी एका महिला डाॅक्टरला अटक

डॉ. पायलच्या आत्महत्येची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. आयोगाने नायर रुग्णालयाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे.

डाॅ. पायल आत्महत्येप्रकरणी एका महिला डाॅक्टरला अटक
SHARES

डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी डॉ. भक्ती मेहर हिला अटक केली आहे.  तर दोन महिला डाॅक्टरांचा पोलिस शोध घेत आहेत. वरिष्ठ महिला डाॅक्टर वारंवार जातीवाचक बोलत असल्यामुळे उद्विग्न झालेल्या नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील  डॉ. पायल तडवी आत्महत्या केली होती. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्यासह वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल या महिला डाॅक्टरांच्या रँगिगला कंटाळून हे पाऊल तिने उचललं होतं. तेव्हापासून या डाॅक्टर फरार होत्या. 


जामीन अर्ज फेटाळला

तिन्ही डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. पायलच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप या डाॅक्टरांवर आहे.  नायर रुग्णालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे या चौघींवर ठपका ठेवण्यात आला आहे. तिघींवर सोमवारी निलंबनाचीही कारवाई करण्यात आली.  डॉ. पायलच्या आत्महत्येची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. आयोगाने नायर रुग्णालयाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, नायर रूग्णालयाबाहेर विविध संघटनांकडून पायलच्या आत्महत्येविरोधात निदर्शने सुरू आहेत. मंगळवारी पालिकेच्या विविध रूग्णालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह पायल ज्या समाजाची होती, त्या तडवी समाजानेही निदर्शने केली. 




हेही वाचा  -

'डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार' – गिरीश महाजन

डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा