दारुसाठी संपवलं जीवन

 Aarey Colony
दारुसाठी संपवलं जीवन

गोरेगाव - आरे परिसरातील एका 34 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलंय. लक्ष्मण कुडिया असं त्याचं नाव आहे. तो फिल्म सिटीत सफाईचं काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मणला दारुचं वेसन होतं. दारुसाठी त्याचं घरात पत्नी आणि आईबरोबर भांडण व्हायचं. लक्ष्मणला कंपनीतून बाहेरगावी पाठवत होते. पण, तो जायला तयार नव्हता. काही दिवसांपासून त्याने कामावर जाणं देखील बंद केलं. त्याची पत्नी देखील फिल्म सिटीतच सफाईचं काम करत होती. 19 जानेवारीला लक्ष्मणने दारुसाठी पत्नीकडून पैसे मागितले. पण, पत्नीने पैसे न दिल्याकारणाने त्याने आपण आत्महत्या करु अशी धमकी दिली आणि तो घरातून निघून गेला. पत्नीने घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगत त्याचा पाठलाग करायला सांगितलं. पण तो सापडला नाही. संध्याकाळी लक्ष्मण घरी परतला नाही म्हणून पत्नीने आरे पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना रविवारी साडे नऊ वाजता लक्ष्मणचा मृतदेह तलावात सापडला. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

 

 

Loading Comments