Advertisement

सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून बसवर दगड भिरकावला

मुंबईच्या बेस्ट बसमध्ये सुट्या पैशांवरून प्रवाशी आणि कंटक्टरमध्ये अनेकदा खटके उडतात. नुकताच असा प्रकार चेंबूर मार्गे चालणाऱ्या बस क्रमांक ३५६ मध्ये घडला. यातील आरोपी जुबेर खान चेंबूरमार्गे प्रवास करत होता. त्यावेळी सुट्या पैशांवरून त्याचा बसचे कंडक्टर प्रकाश राठोड यांच्याशी वाद झाला.

सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून बसवर दगड भिरकावला
SHARES
Advertisement

बेस्ट बसमध्ये कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात सुट्या पैशांवरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त प्रवाशाने बसमधून उतरल्यानंतर बेस्ट बसवरच दगड भिरकावला. हा दगड बसमधील एका प्रवाशाला लागल्याने त्यात प्रवाशी जखमी झाला. या प्रकरणी माथेफिरू प्रवाशावर नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


प्रवासी जखमी

मुंबईच्या बेस्ट बसमध्ये सुट्या पैशांवरून प्रवाशी आणि कंटक्टरमध्ये अनेकदा खटके उडतात. नुकताच असा प्रकार चेंबूर मार्गे चालणाऱ्या बस क्रमांक ३५६ मध्ये घडला. यातील आरोपी जुबेर खान चेंबूरमार्गे प्रवास करत होता. त्यावेळी सुट्या पैशांवरून त्याचा बसचे कंडक्टर प्रकाश राठोड यांच्याशी  वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चेंबूरच्या पोस्टल काॅलनी परिसरात बस पोहचल्यानंतर खान बसमधून उतरला. त्यावेळी राग अनावर झालेल्या खानने  रस्त्यावरील दगड उचलून बसच्या दिशेने भिरकावला. हा दगड बसमधील एका प्रवाशाच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बस कंडक्टरने थेट पोलिस नियंञण कक्षाला फोन करून पाचारण केले.


पोलिस तात्काळ दाखल

 इतर प्रवाशांनी रक्तबंबाळ झालेल्या प्रवाशाला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलवले. काही मिनिटातच नेहरू नगर पोलिसांची गस्तीवर असलेली पोलिस व्हॅन घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी जुबेर खान याला ताब्यात घेतले. कंडक्टर राठोडने दिलेल्या तक्रारीनुसार नेहरू नगर पोलिसांनी जुबेरवर ३५३, ३३७, ४२७, भा.द.वि कलमांसह  सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या प्रकरणात जखमी झालेल्या प्रवाशावर उपचार करून त्याला सोडण्यात आल्याची माहिती नेहरूनगर पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा- 

रेल्वेत नोकरीच्या नावाखाली ७ तरुणांना ३० लाखांचा गंडा

परदेशी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी कुरिअर कंपनीवर गुन्हा
संबंधित विषय
Advertisement