नुसत्या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी २५ कोटींचा दंड वसूल केला

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१४९ वाहने जप्त करण्यात आली.

नुसत्या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी २५ कोटींचा दंड वसूल केला
SHARES

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ५४ हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.  राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते १४ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,५४,९२९ गुन्हे नोंद झाले असून ३४,७४२ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी  २५ कोटी ०८ लाख ७१  हजार ३१४ रु. दंड आकारण्यात आला.

हेही वाचाः- तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ, 'या' ओबीसी नेत्याचा आरक्षणासाठी सरकारला इशारा

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी लक्षणिय वाढ झाली. राज्यात आज दिवसभरात तब्बल २० हजार ४८२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ५१२ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३५६ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचाः-मुंबई-ठाण्यात म्हाडा परवडणारी घरं बांधणार- जितेंद्र आव्हाड

मदतीसाठी १ लाख फोन

कोरोना संक्रमणाच्या काळात  नागरिक सदैव तत्पर असलेल्या पोलिसांकडेच सर्वाधिक फोनकरून मदत मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस विभागाला १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,०३३२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१४९ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १८२ पोलीस व २० अधिकारी अशा एकूण २०२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय