पोलिसांची नजर गोविंदा मंडळांवर!


पोलिसांची नजर गोविंदा मंडळांवर!
SHARES

दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळाल्यानं अाता नियमाच्या चौकटीत राहून दहिहंडी उत्सव साजरा करावा लागणार आहे. या निर्णयाचं गोविंदा पथकांनी स्वागत केलं आहे. मात्र १४ वर्षांखालील मुलांचा गोविंदा पथकात समावेश करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं दिल्यानं पोलिसांची गोविंदा पथकांवर करडी नजर राहणार आहे. तर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लघंन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे दिली.


पालकांचं 'ना हरकत प्रमाणपत्र'

गोविंदा या साहसी खेळात १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या पालकांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. सरकारनं केलेल्या सूचना व नियमांची माहिती अद्याप गोविंदा पथकांपर्यंत पोहोचली नसली तरी नियमाप्रमाणे दहिहंडी फोडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत विविध ठिकाणी रायकीय आयोजकांनी मोठमोठ्या मानाच्या हंड्या उभारल्या आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांना त्या-त्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यास सांगितली आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या चौकांवर आणि अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून विशेष कृती दल, एसआरपीएफसह राखीव पोलीस दल तैनात ठेवलं जाणार आहे.


गोविंदा पथकांना १४ वर्षांखालील मुलांचा समावेश दहिहंडी फोडण्यासाठी करता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित गोविंदा पथकाचे पदाधिकारी आणि आयोजक यांच्यावर कारवाई केली जाईल.
- मंजुनाथ सिंगे, पोलीस प्रवक्ते


हेही वाचा -

सचिन सावंत यांच्या हत्येतील आरोपीला आठ वर्षानंतर अटक

पालकांचा जीव टांगणीला, अन् 'त्या' ५ जणी करत होत्या 'मुंबई दर्शन'



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा