पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची ईडीकडून १० तास चौकशी

अविनाश कदम हे महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची ईडीकडून १० तास चौकशी
SHARES

शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकलेले असताना, आता पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याभोवती देखील ईडीने फास आवळला आहे. ईडीने शुक्रवारी भोसले यांनी १०तास चौकशी केली. अविनाश कदम हे महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

हेही वाचाः- महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली. १० तासानंतर भोसले ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयातून बाहेर पडले. परदेशी चलनाच्या प्रकरणात ही चौकशी झाल्याचे करण्यात आली. . आज सकाळी १०वाजता ते ईडीच्या कार्यालयात आले. १० तास ही चौकशी चालली फेमा प्रकरणात भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला. मनी लाँडरींगप्रमाणे ईडी परदेशी चलन कराप्रकरणाच्या प्रकरणांबाबतही फेमा कायद्या अंतर्गत तपास करते. ईडीच्या चौकशीतून बाहेर पडल्यानंतर भोसले यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणे टाळले. अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः- देश मंदीच्या खाईत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी शुन्याच्या खाली

विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. ईडी परिमंडळ-२ याप्रकरणी तपास करत आहेत. यााबत ईडीचे संचालक एस.के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २००७ मध्ये भोसले परदेशी चलन व महागड्या वस्तू आणल्याप्रकरणी ईडी फेमा अंतर्गत तपास करत होती. पण भोसले यांना नेमक्या कोणत्या फेमाच्या प्रकरणात ईडीकडून बोलवण्यात आले होते. हे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा