ईडी ने केली सुशांत सिंहच्या वडिलांची चौकशी

ईडीने सोमवारी सुशांतचे वडिल के. के सिंह या जबाब नोंदवल्याचे कळते. त्यात सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यातून तब्बल १ कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढण्यात आल्याचे आरोप केले आहे

ईडी ने केली सुशांत सिंहच्या वडिलांची चौकशी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या करून आता दोन महिने झाले. मात्र त्यांच्या आत्महत्या करण्या मागेचे कारण आजही गुलदस्त्यात आहे. अशातच या संपूर्ण प्रकारणाचा तपास सीबीआयला देण्यावरून आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. अशातच ईडीने सोमवारी सुशांतचे वडिल के. के सिंह या जबाब नोंदवल्याचे कळते. त्यात सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यातून तब्बल १ कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढण्यात आल्याचे आरोप केले आहे. या आरोपावर ईडीने के.के. सिंह यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

हेही वाचाः- Exclusive डी कंपनीतल्या ‘या’ कुख्यात डॅानला झाली कोरोनाची लागण

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर सुशांतने उचललेल्या या पाऊलास रिया चक्रव्रती  जबाबदार असल्याचा आरोप के.के. सिंह यांनी केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार सुशांतच्या खात्यातून एका निनावी खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे वळवण्यात आले आहे. ज्या  व्यक्तीच्या खात्यात पैसे वळवण्यात आले होते. त्याचा आणि सुशांतचा काहीही संबध नाही. ही खाती रिया आणि तिच्या कुटुंबातीलय व्यक्तींपैकी कुणाची तरी असू शकतात. त्यामुळे या आरोपाची शहानिशा करण्यासाठी ईडी इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप कॉलची माहितीही त्याद्वारे ईडीकडे परत येईल.

 हेही वाचाः-गुड न्यूज ! मुंबईला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं

त्याच बरोबर ईडी रिया चक्रवर्तीचा सीए रितेश शाह याला कधीही चौकशीसाठी बोलावू शकतात. त्यानंतर ईडीकडून पून्हा रिया आणि तिच्या कुटुंबियांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने ईडीच्या प्रश्नांची अद्याप समाधान कारक उत्तरे दिलेली नाहीत. रिया चक्रवर्तीने सादर केलेला तिच्या खर्चांचा तपशील, तिची प्राँपर्टी तसेच तिला कामातून मिळणारे पैसे यात मोठी तफावत असल्याचे सांगितले जाते. या पूर्वी ईडीने दोनदा रिया आणि तिच्याकुटुंबियांची चौकशी केली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा