PMC Bank Scam: हितेंद्र ठाकूरांच्या विवा समूहाची ३४ कोटींची मालमत्ता जप्त

पीएमसी बँकेतून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी काही उद्योगसमूह ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने मागील महिन्यात विवा समूहाची कार्यालये आणि ठाकूर बंधूंच्या घरांवर छापे टाकले होते.

PMC Bank Scam: हितेंद्र ठाकूरांच्या विवा समूहाची ३४ कोटींची मालमत्ता जप्त
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळाप्रकरणी विवा समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. 

पीएमसी बँकेतून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी काही उद्योगसमूह ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने मागील महिन्यात विवा समूहाची कार्यालये आणि ठाकूर बंधूंच्या घरांवर छापे टाकले होते. आता ईडीने अंधेरी पूर्वेकडील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता जप्त केली आहे. मॅक स्टार या कंपनीने ही मालमत्ता बांधली आहे.

मॅक स्टार ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. एचडीआयएल ही पीएमसी बँक घोटाळ्यातील सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांचे संगनमत असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. त्यामुळे अंधेरीतील ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

एचडीआयएलचे राकेश व सारंग वाधवान यांनी मॅक स्टारच्या अंधेरीतील मालमत्ता बेकायदा विवा समूहाकडे वळवल्या. त्यामध्ये दोन कार्यालयांचा समावेश असून त्यांची किंमत ३४ कोटी ३६ लाख रुपये आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळवला. एचडीआयएलने येस बँकेचे कर्जदेखील बुडवले आहे. या कर्जाचा एचडीआयएल आणि विवा समूहाने गैरवापर केला असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.



हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा