नैराश्येतून तरुणाचा सी-लिंकवर आत्महत्येचा प्रयत्न

विजयने टँक्सीवाल्याला टँक्सी थांबवण्यास सांगितली. माञ टँक्सीवाल्याने टँक्सी थांबवण्यात येथे परवानगी नसल्याचे सांगितल्यानंतर विजयने चालू टँक्सीतून उडी टाकली.

नैराश्येतून तरुणाचा सी-लिंकवर आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवरून विजयकुमार परमार (१८) या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सी-लिंकवरील सुरक्ष रक्षकांनी त्याला वेळीच अडवले. मात्र एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या चाकूने स्वत:वर पुन्हा हल्ला करून जीव धोक्यात घातला. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


टॅक्सीतून उडी मारली

 मूळचा गुजरातच्या केसरचा राहणाऱ्या विजयकुमारने २०१७ मध्ये घर सोडले होते. तो दादरच्या मनिष मार्केटमधील कपड्याच्या दुकानात कामाला राहिला. मात्र त्याचे सर्व काही अलबेल सुरू नव्हते. याच नैराश्येतून त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.  सध्या तो वरळीच्या कोळी वाड्यात भाड्याने राहत आहे. 

 वांद्रे-वरळी सी-लिंकवर मंगळवारी दुपारी विजय टॅक्सीने वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी विजयने टॅक्सीवाल्याला टॅक्सी थांबवण्यास सांगितली. मात्र टॅक्सीवाल्याने टॅक्सी थांबवण्यास येथे परवानगी नसल्याचे सांगितल्यानंतर विजयने चालू टॅक्सीतून उडी मारली.  टॅक्सीतून बाहेर पडल्यानंतर विजय सी लिंकवरून उडी मारणार तोच गस्तीवरील सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले. त्यावेळी विजयने स्वत: सोबत आणलेल्या चाकूने स्वत:च्याच गळ्यावर वार केले आणि हाताची नस कापून घेतली. मात्र सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान दाखवून विजयला वेळीच भाभा रुग्णालयात नेले.  सध्या विजयची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.



हेही वाचा  -

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर

बनावट दागिने गहाण ठेवून बँकांची फसवणूक, ६ जणांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा