वरळीत भावाकडून भावाची हत्या


वरळीत भावाकडून भावाची हत्या
SHARES

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून थोरल्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याची घटना वरळी येथे घडली.  दिनेश गुप्ता (४१) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेश गुप्ता (४८) याला अटक केली. 


दूध व्यवसायावरून वाद 

वरळीच्या मद्रासवाडीतील मोतीलाल नेहरूनगर परिसरात दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहतात. दिनेशचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यामुळे दुध घेण्यासाठी त्यांच्या घरी कायम लोक येत असत.  मात्र, हे राजेशला खटकत असे. यावर दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचा. दुधाची गाडी मध्यरात्री येत असल्यामुळे घरातील लाईट पहाटेपासून लागलेली असायची. त्यावरूनच मंगळवारी मध्यरात्री दिनेश आणि राजेशमध्ये जोरदार भांडण झाले.  संतापलेल्या दिनेशने राजेशच्या अंगावर पाणी ओतल्याने वाद आणखी चिघळला. त्यावेळी राग अनावर झालेल्या राजेशने पुऱ्या तळण्याच्या झारीने दिनेशच्या डोक्यात आणि मानेवर डाव्या बाजूस मारहाण केली. यामध्ये दिनेश जागेवरच कोसळला. घरातील इतर लोकांनी जखमी दिनेशला तातडीने रुग्णालयात हलवले.  मात्र, अगोदरच दिनेशचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा - 

मुलुंड कोर्टाबाहेर प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या

साजिद खाननंही केलं आयपीएलमध्ये बेटिंग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा