एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची थेट गोंदियात बदली

दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मुंबईतून थेट गोंदियामध्ये पाठवल्याने त्यांंना साईडलाईन केल्याचं दिसत आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची थेट गोंदियात बदली
SHARES

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबईतून थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. दहशतवादी विरोधी पथकातून त्यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली केली आहे. 

दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मुंबईतून थेट गोंदियामध्ये पाठवल्याने त्यांंना साईडलाईन केल्याचं दिसत आहे. अपर पोलीस महासंचालक कुलवंत कु. सारंगल (आस्थापना) यांनी दया नायक यांच्य बदलीचा आदेश काढला आहे.  

नायक यांना दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे व तसं कळवावं. तसंच गोंदिया जिल्हा जात पडताळणी समिती उपसंचालकांनीही दया नायक हे तेथे हजर झाल्याची तारीख कळवावी, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

दया नायक यांनी मागील वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मुख्य म्हणजे मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमला दया नायक लीड करत होते. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. 

मुंबई पोलिसमध्ये सध्या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे. १९९५ मध्ये दया नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. १९९८-९९ पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९६ साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास ८० एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.



हेही वाचा -

संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!

  1. ‘कोविन-ॲप' नोंदणी आणि प्राप्त 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसारच होणार लसीकरण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा