Advertisement

‘कोविन-ॲप' नोंदणी आणि प्राप्त 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसारच होणार लसीकरण

नोंदणी नसलेल्यांनी गर्दी न करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय.

‘कोविन-ॲप' नोंदणी आणि प्राप्त 'अपॉइंटमेंट स्लॉट' नुसारच होणार लसीकरण
SHARES

मुंबई महापालिकेनं लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ यानुसारच लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्यांनी गर्दी न करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. मात्र यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं आणि नागरिकांना सुलभतेनं लसीकरण करता यावं, या उद्देशानं हे पाऊल उचलंल आहे.

आता केवळ ‘कोवीन ॲप’ किंवा ‘कोविन पोर्टल’ यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश आज सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.

४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे ‘हार्ड कॉपी’ किंवा ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरूपात सादर करावी. त्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.



हेही वाचा

कोविड संकटातील उपाययोजनांसाठी १४१ कोटींचा निधी वितरीत

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा