एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी झाली असता कोर्टाने शर्मा यांना दिलासा दिला.

एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
SHARES

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep sharma) , संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी ( judicial custody) सुनावण्यात आली आहे. विशेष एनआयए न्यायालयाने (nia court) सोमवारी (दि.२८) रोजी हे आदेश दिले. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्यांची चौकशी सुरू आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी व्यवसायिक मनसुख हिरेन यांची होती. मात्र, काहीच दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत सापडला. एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संतोष आत्माराम शेलार आणि आनंद जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएने प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे.

 एनआयए कोर्टाने त्यांना २८ जूनपर्यंत कोठडी दिली होती. या कोठडीमध्ये आता १२ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  दरम्यान, वकिलास भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून शर्मा यांनी एनआयए कोर्टात अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी झाली असता कोर्टाने शर्मा यांना दिलासा दिला. प्रदीप शर्मा त्यांच्या वकिलांना दररोज दुपारी १२ ते १२.२० या वेळेत भेटू शकतात, असे परवानगी देताना कोर्टाकडून देण्यात आली होती.

मालाडमधील रहिवासी असलेल्या बिल्डर संतोष शेलार याच्यासह आनंद जाधव याला एनआयएने ११ जून रोजी लातूरमधून ताब्यात घेत अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून प्रदीप शर्मा याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. एनआयएच्या पथकाने प्रदीप शर्मा याला लोणावळा येथून ताब्यात घेत १७ जून रोजी अटक केली. 

या प्रकरणामध्ये एपीआय सचिन वाझे हे मुख्य सूत्रधार आहेत. एनआयएने या प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांच्यासह अनेक डीसीपी आणि २५ पेक्षा जास्त पोलिसांचीही चॊकशी केली आहे.हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा