इव्हेन्ट ऑर्गनायजरला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

लोअर परळ येथील सोशल क्‍लब येथे सर्व मित्रांना भेटले. त्यानंतर ते सर्व गोदरेज कॉलनी येथील मलीक शहा नावाच्या मित्राच्या घरी गेले. तेथे दोघांनीही मद्यप्राशन केले.

SHARE

पार्टीच्या नावाखाली विवाहितेला मित्राच्या घरी बोलवत, मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना विक्रोळी इथं उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय इव्हेन्ट ऑर्गनायजरला विक्रोळी येथील पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

विवाहितेवर बलात्कार 

आदीत्य पुलकेश या व्यक्तीचं नावं असून, तो वर्सोवाच्या म्हाडा वसाहतीत राहतो. आदित्यनं त्याच्या पीडित मैत्रीणीला पार्टीसाठी बोलावलं होते. ती विवाहीत आहे. सध्या आपल्या माहेरी राहत आहे. आदित्य तिला विविध ठिकाणी घेऊन फिरला. त्यानंतर ते लोअर परळ येथील सोशल क्‍लब इथं सर्व मित्रांना भेटले. त्यानंतर ते सर्व गोदरेज कॉलनी येथील मलीक शहा नावाच्या मित्राच्या घरी गेले. तिथं दोघांनीही मद्यप्राशन केलं. त्यानंतर आरोपी आदित्य तिला बाथरुमध्ये घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. 

त्यानंतर हा प्रकार कोणाला न सांगण्यासाठी धमकावलं. त्यानं टॅक्‍सी केली व पीडित तरुणीला घरी सोडण्याचं आश्‍वासन दिलं. त्यावेळी प्रवासादरम्यान तिनं आपल्यासोबत केलेल्या कृत्याचा जाब विचारला असता त्यानं तिला धमकावलं व त्यानंतर मारहाणही केली. तिनं घरी पोहोचल्यानंतर सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पिडीत तरुणीची वैद्यकीय तपासणी केली. तसंच, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत १५ डबा जलद लोकल

एसी लोकलला प्रदूषणाचा फटका, लोकलमध्ये धूळयुक्त हवेची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या