सपाच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या

नूरजहाँ यांच्या पतीवर विविध गुन्ह्याची नोंद असल्यामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असायचे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सपाच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या
SHARES

गोवंडीतील शिवाजी नगरमधील समाजवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आयेशा शेख यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका नूरजहाँ रफिक शेख यांनी सोमवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली.


पाणी प्रश्नावर काम

नूरजहाँ रफिक शेख २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत दोनवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तसंच एम पूर्व व पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं होतं. नूरजहाँ यांनी विभागातील पाणी प्रश्नाबाबत मोठा लढा देत महापालिकेत सतत आवाज उठवला होता.



कारणाचा तपास सुरू

त्यांच्या पतीवर विविध गुन्ह्याची नोंद असल्यामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असायचे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस तपास करत आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सध्या गोवंडी शिवाजी नगर येथील प्रभाग १३७ मधून त्यांची कन्या आयेशा शेख ही नगरसेवक म्हणून महापालिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.


उपविभागप्रमुखाचा मृत्यू

धारावीतील शिवसेना नगरसेविका मारिअम्माल थेवर यांचे पती आणि धारावीचे शिवसेना उपविभाग प्रमुख मुथू थेवर यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. त्यामुळे महापालिकेच्या दोन सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



हेही वाचा-

प्रियकराच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रेयसी ताब्यात

'ऑईल' माफियांचा पर्दाफाश, टँकरखाली पाईप लावून करायचे चोरी!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा