घरपोच दारू पोचवल्याबद्दल वाईन शाॅपला १८.९ लाखांचा दंड, उत्पादन शुल्कची कारवाई

पाली हिल भागातील एका शाॅपमधून घरपोच दारू पोचवली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी दुपारी अधिकाऱ्यांनी या वाईन शाॅपवर पाळत ठेवली होती.

घरपोच दारू पोचवल्याबद्दल वाईन शाॅपला १८.९ लाखांचा दंड, उत्पादन शुल्कची कारवाई
SHARES

अनधिकृतरित्या घरपोच दारू पोचवल्याबद्दल वांद्रेतील एका वाईन शाॅपला १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड उत्पादन शुल्क विभागाने ठोठावला अाहे. वाईन शाॅपमधून घरपोच दारू मागवणं कायद्यानं गुन्हा अाहे. यासाठी ६ महिन्यांचा तुरूंगवास किंवा ५ हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.


पाळत ठेवून कारवाई

पाली हिल भागातील एका शाॅपमधून घरपोच दारू पोचवली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी दुपारी अधिकाऱ्यांनी या वाईन शाॅपवर पाळत ठेवली होती. यावेळी त्यांना दोघे जण बाईकच्या डिकीत कापडी पिशवीत दारूच्या बाटल्या नेत असल्याचं अाढळून अालं. दोघांची चौकशी केली असता त्यांनी बाटल्या घरपोच देण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं. अधिकाऱ्यांनी ही दारू जप्त केली अाहे.
 


मुलांकडून मागणी

हे वाईन शाॅप पहाटे ३-४ वाजेपर्यंत सुरू असते. येथील १० कर्मचारी घरपोच दारू पोचवण्याचं काम करत असल्याचं उघडकीस अालं अाहे. घरपोच दारू मागवणारी लहान मुले असल्याचं यापूर्वीच कारवाईत उघड झालं अाहे. तसंच ही दारू बनावट असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ही दारू अपायकारक ठरू शकते. 



हेही वाचा - 

पुरोहित यांना मिळणार मालेगाव स्फोटाचे फोटो, व्हिडिओ

कमकुवत सुरक्षा रक्षकांची कार्यालयं होती नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा