पुरोहित यांना मिळणार मालेगाव स्फोटाचे फोटो, व्हिडिओ


पुरोहित यांना मिळणार मालेगाव स्फोटाचे फोटो, व्हिडिओ
SHARES

मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थे (एनआयए)च्या विशेष न्यायालयाकडे या स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ देण्याची विनंती केली हाेती. पुरोहित यांची ही विनंती न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यानुसार मालेगाव स्फोटाचे व्हिडिओ आणि फोटोची एक प्रत पुरोहित यांना देण्यात येणार आहे.


पुरावे तपासण्यासाठी

आपल्या विरोधातील आरोपांचं खंडन करण्यासाठी भक्कम बाजू तयार करता यावी म्हणून पुरोहित यांनी न्यायालयात दाखल करण्यात आलेले पुरावे तपासण्यासाठी न्यायालयाला ही विनंती केली होती. तपास पथकाने त्यांच्या या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र विशेष न्यायाधीश व्ही. एस. पडालकर यांनी रजिट्रार यांना आदेश देऊन पुरोहित यांना व्हिडिओ आणि फोटो उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.


पुढील सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इतर ५ आरोपींविरोधात ३० आॅक्टोबर रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते.



हेही वाचा-

मालेगाव बाँम्बस्फोट : कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंहवर अारोप निश्चित

मालेगाव बाॅम्बस्फोट: आरोप निश्चितीची सुनावणी सोमवारी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा