मालेगाव बाँम्बस्फोट : कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंहवर अारोप निश्चित

एनअायएने कर्नल पुरोहित अाणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याशिवाय सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी अाणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर अारोप निश्चित केले अाहेत.

SHARE

२००८ साली मालेगाव येथे झालेल्या बाँम्बस्फोटातील जामिनावर असलेले मुख्य अारोपी कर्नल पुरोहित अाणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनअायए) विशेष न्यायालयाने दहशतवादी कट अाणि हत्येचा अारोप निश्चित केला अाहे. याशिवाय इतर ७ अारोपींवरही अारोप निश्चित करण्यात अाले अाहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार अाहे. 


निर्दोषत्व सिद्ध होईल

याबाबत साध्वी प्रज्ञा सिंहने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझ्याविरोधात काँग्रेसने हा कट रचला अाहे. याअाधी एनअायएने मला क्लीन चीट दिली होती. अाता माझ्याविरोधात अारोप निश्चित केले अाहेत. मला खात्री अाहे की माझं निर्दोषत्व सिद्ध होईल. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. 


७ जणांचा मृत्यू

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीजवळ मोटरसायकलवर स्फोटके बांधून स्फोट घडवून अाणण्यात अाला होता. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास अाधी एटीएसकडे देण्यात अाला होता. त्यानंतर हा तपास एनअायएकडे सोपवण्यात अाला. एनअायएने याप्रकरणी कर्नल पुरोहित अाणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याशिवाय सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी अाणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर अारोप निश्चित केले अाहेत. हेही वाचा - 

मालेगाव बाॅम्बस्फोट: आरोप निश्चितीची सुनावणी सोमवारी

ओला, उबरच्या आंदोलनात चालकाला मारहाण, ४ जणांना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या