नागरिकांना लुटणारे दोन तोतये पोलिस पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई विमानतळ परिसरातील परदेशी नागरिकांना तसंच परराज्यातून आलेल्यांना पोलिस असल्याचं सांगत त्यांची लुबाडणूक करणारे दोन तोतये पोलिस अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

नागरिकांना लुटणारे दोन तोतये पोलिस पोलिसांच्या जाळ्यात
SHARES

मुंबई विमानतळ परिसरातील परदेशी नागरिकांना तसंच परराज्यातून आलेल्यांना पोलिस असल्याचं सांगत त्यांची लुबाडणूक करणारे दोन तोतये पोलिस अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. मोहम्मद काझीम मोगा (४६ वर्षे) आणि मुस्तफा चरणाईया (३४ वर्षे) अशी या दोघा तोतया पोलिसांची नावं आहेत. तर पोलिसांच्या नावे फसवणूक करणारी तोतया पोलिसांची टोळीच या परिसरात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिस या टोळीचा, टोळीतील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.


असा सुरू होता 'या' टोळीचा धंदा

विमानतळ परिसरातील परदेशी आणि परराज्यातील नागरिकांना गाठायचं. मग या नागरिकांना आपण पोलिस असल्याचं सांगत त्यांना कोणत्या तरी गोष्टीत अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची आर्थिक लुबाडणूक करायची असा धंदा या टोळीचा सुरू होता. २५ जानेवारीला कर्नाटकातून आलेल्या एका नागरिकाला या टोळीनं असा गंडा घालत लुटण्याचा प्रयत्न केला. पण या नागरिकानं सतर्कता दाखवत पोलिसांच्या मदतीनं या टोळीला अटक करून देण्याची कामगिरी करून दाखवली आहे.


नेमक काय घडलं?

कर्नाटकाचे नागरिक, तक्रारदार शाहरूख उस्मान कानसूर (२५ वर्षे) हे २५ डिसेंबरला 6E-62 या विमानानं दुबईहून मुंबईला पोहचले. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडताना तोतया पोलिसांच्या टोळीतील दोघांनी त्यांची वाट अडवली. सुरक्षेच्यादृष्टीनं आपली तपासणी करावी लागेल असं सांगतलं. तर आपण खरेच पोलिस आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणून या दोघांनी आपली बनावट ओळखपत्रही कानसूर यांना दाखवली. त्यानंतर बॅग तपासण्याचा बहाणा करत या दोघांनी जबरदस्तीनं बॅग खेचून नेण्याचा प्रयत्न केला. तर या टोळीतलं आणखी दोन साथीदारही या दोघांच्या मदतीला आले. हा प्रयत्न सुरू असतानाच कानसूर यांना हे काही तरी विचित्र असल्याचं लक्षात आल्याबरोबर त्यांनी सतर्क होत ही बाब नजीकच्या कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली.


नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

कस्टम अधिकाऱ्यांनी त्वरित तिथं धाव घेतली आणि मुस्तफा चरणाईया तसंच मोहम्मद काझीम मोगाला ताब्यात घेतलं. मात्र त्याचवेळी या दोघांच्या दोन साथीदारांना तिथून पळ काढण्यात यश आलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी केली असता हे दोघं तोतया पोलिस असून ते नागरिकांची लुबाडणूक करत असल्याचं समोर आलं. त्याबरोबर कस्टम अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांना बोलावत या दोघांना पोलिसांच्या हवाली केलं आहे. या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पळून गेलेल्या दोघांचा आता पोलिस शोध घेत आहेत. तर नागरिकांनी विशेष काळजी घेत सतर्क रहावं असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

लग्नासाठी तरूणीवर बळजबरी करणारा अटकेत

आयसीआयसीआय कर्जवाटप- व्हिडीओकाॅनच्या धूत यांच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा