Corona virus : मुंबईतून एक कोटींचं सॅनिटायझर जप्त

परिस्थिताचा गैरफायदा घेऊन बनावट सॅनिटायझरचा काळाबाजार

Corona virus : मुंबईतून एक कोटींचं सॅनिटायझर जप्त
SHARES

देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून प्रशासन त्यांच्याशी दोन हात करत आहेत. अशातच परिस्थिताचा गैरफायदा घेऊन बनावट सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू केला आहे. नाहूर मधून अन्न-औषध प्रशासनाच्या विभागाने तब्बल १ कोटीचे बनावट सॅनेटाइझर जप्त केले आहे. हे बनावट सॅनेटाइझर परदेशात पाठले जात असल्याचे तपासात पुढे आले असून एकाला अन्न-औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. 

 हेही वाचाः- जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ

राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहे. बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा लक्षात घेता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी कमी दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि मास्क बाजारात आणले जात आहे. मुंबईतील नाहूरमधून एक कोटींचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचाः- Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...

मुंबईतील नाहूरमधून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतून विदेशात पाठवण्यासाठी हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाई केली. विशेष हे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांनी उत्पादनाचा परवानाही घेतला नव्हता. सिद्धिविनायक डायकॅम प्रा.लिमिटेड कंपनीचे नाव या कंपनीचे नाव असून  जग भरात सॅनिटायझरचा दुष्काळ असल्याचा फायदा घेत बक्कळ पैसे कमावण्याचा कंपनीचा प्रयत्न होता.

 

 

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा