प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला धमकी

फोनवरील समोरच्या व्यक्तीने दिपाली यांना तू नगरला येऊनच दाखव, तसेच दिपालीला बलात्कार व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला धमकी
SHARES

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदला एका निनावी फोनवरून धमकावण्यात आल्याचे पुढे आले आहे. धमकवणाऱ्याला दिपाली यांनी पोलिसात जाण्याची भिती दाखवली असता. त्याने दिपाली यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिपाली सय्यद यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे.

हेही वाचाः- केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

अभिनेत्री दिपाली सय्यद या ४ आँक्टोंबर रोजी त्यांच्या घरी असताना. सायंकाळी त्यांच्या मोबाइलवर एक निनावी फोन आला. फोन उचलल्यानंतर समोरील व्यक्तींने दिपाली यांना एका कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावर दिपाली यांनी समोरील व्यक्तीला कार्यक्रमाबाबत मानधन सांगितले. त्यानंतर आरोपी हा दिपाली यांच्याशी अश्लीलरित्या बोलू लागला.  त्यावेळी दिपाली यांनी त्याला पोलिसात जाण्याची भिती दाखवली असता. फोनवरील समोरच्या व्यक्तीने दिपाली यांना 'तू नगरला येऊनच दाखवं, तसेच दिपालीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली'. त्यानंतर दिपाली यांनी तो फोन कट केला. मात्र वारंवार समोरील व्यक्ती दिपाली यांच्या फोनवर फोन करून त्रास देत होता. ट्रूकाँलरवर त्या नंबरची नोंद ही संदीप वाघ अशी दाखवल्याचे दिपाली यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचाः- भयंकर! कुर्ल्यात शाॅक लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ७ जण जखमी

त्यानंतर दिपाली यांनी त्यांच्या एका मानलेल्या भावाकडे या फोननंबर बाबत चौकशी केली. त्यांच्या भावाने त्या नंबरवर फोन करून त्याला पोलिसांची भीती दाखवली असता. उलट फोनवरील आरोपीनेच  दिपाली या माझाकडून ड्रग्ज घेत असल्याचे सर्वांना सांगिन असे धमकावले.  २०१९ मध्ये दिपाली या अहमदनगर येथे पाणी प्रश्नावर उपोषण केले होते. तसेच पाण्यावरून त्यांनी तेथील ३५ गावांमध्ये जनजागृती केली होती. त्यावेळी त्यांना एका निनावी नंबरहून व्हाँट्स अँपवर मेसेज केले होते. त्याचा नंबरदेखील ट्रू काँलरवर तपासला असता. त्यावर संदीप वाघ असे नाव लिहून आले होते. तो आणि आता धमकीसाठी आलेला फोन हा एकाच व्यक्तीने केल्याचा संशय दिपाली यांना आहे. या प्रकरणी दिपाली यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा